व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या – चौथ्या मार्गिकेसाठी निधी द्या ! खासदार बारणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 10, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Pune to Lonavala Railway Route Third and Fourth Rail Track Project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी राज्य सरकारची ५० टक्के हिश्‍श्‍याची रक्कम तातडीने द्यावी. त्यामुळे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांना तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पातील राज्य सरकारचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी केली.

खासदार बारणे म्हणाले, गेल्या तीन दशकांपासून पुणे, लोणावळा दरम्यान तिसरा आणि चौथा ट्रॅक व्हावा अशी मावळ लोकसभा मतदारसंघातील आणि पुणे शहरातील नागरिकांची मागणी आहे. २०१४ मध्ये मी निवडून आल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा सुरु केला. केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे बोर्डाने महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली.

प्रकल्पाचा ५० टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि ५० टक्के राज्य सरकार, अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या ५० टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्‍श्‍याचा निधी न दिल्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. नागरिकाची सोय आणि लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी ह्या मार्गिक होणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांसाठी राज्य सरकारच्या हिश्‍श्‍याचा निधी तत्काळ मिळावा, असे बारणे यांनी सांगितले.

तिसरा, चौथा ट्रॅक करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव हे सहकार्य करीत आहेत. मागील आठवड्यात ते पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी या कामाला तत्काळ सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही निधी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हिस्सा मिळून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी आशा आहे.

अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link


Previous Post

वेहेरगाव येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 5 जोडप्यांचे शुभमंगल सावधान । Karla News

Next Post

लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Monika Zarekar from Lonavala becomes Class One officer Selected as Assistant Regional Transport Officer from MPSC

लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

पवनमावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची निवड

May 6, 2026
Police remove accused in BJP worker Ramesh Reddy murder case from scene

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

May 6, 2026
leopard Image

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 6, 2026
Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.