व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 10, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Monika Zarekar from Lonavala becomes Class One officer Selected as Assistant Regional Transport Officer from MPSC

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मावळ तालुक्यात भांगरवाडी, लोणावळा येथील कु. मोनिका बाळासाहेब झरेकर हिची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग एक) पदी निवड झाली आहे. मोनिकाच्या या उज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण अभ्यास करीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मोनिका झरेकर हिची यापूर्वी मंत्रालय कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, वजन-मापे निरीक्षक अधिकारी आणि कर व प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद अशा चार पदांसाठी निवड झाली होती. परंतु त्यानंतरही तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. यानंतर आता तिची MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड झाली आहे.

मोनिका बाळासाहेब झरेकर हिचे प्राथमिक शिक्षण ऑक्सिलियम कॉन्व्हेंट लोणावळा येथे झाले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय लोणावळा येथून मेकॅनिकल इंजिनीरिंग या विषयात तिने पदवी घेतली. त्यानंतर काही काळ एका खासगी कंपनीत काम केले. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्धार करून तिने परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. यानंतर जिद्धीने व चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास करीत कुटुंबाच्या साथीने तिने एमपीएससीमधून क्लास वन ची पोस्ट प्राप्त केली आहे.

  • सध्या मोनिका तळेगाव दाभाडे येथे कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या कालावधीत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग एक) पदासाठी दिलेल्या परीक्षेद्वारे निवड झाली आहे. मोनिकाचे वडील बाळासाहेब झरेकर हे नुकतेच नौसेना अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बबनराव झरेकर आणि नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ झरेकर यांची ती पुतणी आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गोविंदराव शिंदे यांची ती भाची आहे. तिच्या यशाचे सध्या लोणावळा आणि मूळ गावी व परिसरात कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link


dainik maval jahirat

Previous Post

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या – चौथ्या मार्गिकेसाठी निधी द्या ! खासदार बारणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Next Post

कामशेत, पौड येथील घटनांचा तीव्र निषेध ; वडगाव शहरात हिंदू संघटनांकडून भव्य निषेध मोर्चा । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Strong condemnation of incidents in Kamshet Paud protest march by Hindu organizations in Vadgaon Maval

कामशेत, पौड येथील घटनांचा तीव्र निषेध ; वडगाव शहरात हिंदू संघटनांकडून भव्य निषेध मोर्चा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.