व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाच्या मावळ तालुक्यातील पाचही मंडल अध्यक्षांची नियुक्ती ; ‘या’ पाच कार्यकर्त्यांना मिळाली संधी । Maval BJP

भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक रचनेत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. यातील महत्वाचा बदल म्हणजे विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्ष पदाऐवजी आता मंडल अध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 12, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
bjp-party-flag

file image


Dainik Maval News : भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक रचनेत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. यातील महत्वाचा बदल म्हणजे विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्ष पदाऐवजी आता मंडल अध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे. यात 100 बूथ मिळून एक मंडल अध्यक्ष अशी रचना करण्यात आली आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. पक्षाच्या या नवीन संघटनात्मक बदलानुसार मावळ तालुक्यामध्ये पाच मंडल तयार करण्यात आली आहेत.

मावळ तालुक्यामध्ये एकूण 402 बूथ असून त्यामधून हे पाच मंडळ निर्माण करण्यात आले आहेत. या नव्या रचनेनुसार मावळ तालुक्यात पवन मावळ मंडल, वडगाव-आंदर मावळ मंडल, तळेगाव दाभाडे-इंदोरी गण मंडल, देहू – देहूरोड मंडल आणि लोणावळा-कार्ला गण मंडल असे पाच मंडलांची निर्मिती करण्यात आली आहे.

पक्षाकडून या पाचही मंडल विभागात मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणचे मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

मावळ भाजपात पवन मावळ मंडळ अध्यक्ष पदी दत्तात्रय माळी, वडगाव-आंदर मावळ मंडळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, तळेगाव दाभाडे -इंदोरी गण मंडळ अध्यक्ष पदी चिराग खांडगे, देहू-देहूरोड मंडळ अध्यक्ष पदी रघुवीर शेलार आणि लोणावळा – कार्ला गण मंडल अध्यक्ष पदी अनिल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षासमोरील प्रमुख आव्हान…
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाची मोठी वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच दुफळी माजली, सोबत पक्षातीलच अनेक दिग्गज नेते परस्परांविरोधात उभे ठाकले. यानंतर आता पुढे येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला आपली एकजूट दाखविण्याचे आणि गतवैभव परत मिळविण्याचे आव्हान असणार आहे. सोबत पक्षातील दुफळी लक्षात घेता सर्वांची मोट बांधून पक्षाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी सर्वच नवनियुक्त मंडल अध्यक्षांना विशेष कष्ट घ्यावे लागणार आहे.

अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro

Next Post

मळवली रेल्वे उड्डाणपुलाचा नवीन आराखडा रद्द करा ; स्थानिकांची आग्रही मागणी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Cancel new plan of Malavali railway flyover Locals demand it

मळवली रेल्वे उड्डाणपुलाचा नवीन आराखडा रद्द करा ; स्थानिकांची आग्रही मागणी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.