व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने आणि समन्वयाने करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना । MP Shrirang Barne

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2025
in महाराष्ट्र
Review meeting of Karjat Khalapur constituency concluded in the presence of MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विकासकामांचा वेग वाढवावा. विकास कामे करताना समन्वय ठेवावा.  नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.

  • या बैठकीस प्रांताधिकारी  प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी  समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख  संतोष भोईर, जिल्हा संघटक  संभाजी जगताप, विधानसभा समन्वयक भाजप  दिलीप बेहेरे, जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख  पंकज पाटील, तालुकाप्रमुख  सुदाम पवाळी, तालुका संघटक  सुनील रसाळ, तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, सुरेश टोकरे, माजी नगरसेवक ॲड. संकेत भासे, दिपक बेहरे, प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीए, एमएमआरडीए, महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, वन, पाणीपुरवठा व स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, पोलीस, बांधकाम, महसूल अभिलेख, जलसंपदा, सामाजिक न्याय, नगरपरिषद, निबंधक कार्यालय, पर्यटन, महावितरण, अंगणवाडी, रोजगार हमी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, इतर यंत्रणा व स्थानिक प्रशासन अशा एकूण ३२ विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

  • खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “विकासकामांचा दर्जा, प्रलंबित कामे, अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने व समन्वयाने काम करावे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, वीजखांब आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. कृषी क्षेत्रात झालेल्या नुकसानीबाबत संबंधित खात्यांनी तातडीने कार्यवाही करावी.,”

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले,  “शासन आणि प्रशासन एकत्र आले तरच विकासाला गती मिळते. ‘टीमवर्क’च्या माध्यमातून काम केले पाहिजे. स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व विभागांनी यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. कर्मचार्‍यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी स्वरूपात मागणी करावी, त्यावर शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • वनमंत्री  गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागी वन उद्यान विकसित करण्यासाठी वन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका देखील आमदार थोरवे यांनी मांडली.

बैठकीत विविध खात्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या. भूअभिलेख विभागाने मोजणीसाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आणले. अंगणवाडी विभागाच्या भारती साताळकर यांनी ‘लेक लाडकी’ योजनेत ४९९ पैकी ४७१ मुलींना पहिला हप्ता वितरित झाल्याची माहिती दिली. मात्र, ४५ अंगणवाड्यांना अद्याप स्वतःची जागा उपलब्ध नाही. शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी तालुक्यातील ३५५ शाळा १६ जूनपासून सुरु होणार असल्याचे सांगितले.

तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामांत तीन महिन्यांचे धान्य साठवण्यात येत असल्याचे सांगितले. वन विभागाने पळसदरीतील दरडींमुळे संभाव्य धोका अधोरेखित केला असता, त्यावर पावसाळ्यापूर्वी कारवाईचे आदेश देण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

Next Post

देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
first mobile veterinary clinic was inaugurated by Deputy Chief Minister Ajit Pawar

देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.