व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा परिषदेचे 20 शिक्षक झाले विस्तार अधिकारी ; मावळमध्ये मुख्याध्यापक संदीप काळे यांची नियुक्ती । Maval News

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 20 शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
20 teachers in Pune Zilla Parishad Education Department have been promoted as Extension Officers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 20 शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्ह्यातील संबंधित पंचायत समित्यांच्या गटविकासअधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश जारी केले आहेत.

novel skill dev ads

या निर्णयामुळे मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मावळ तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक संदीप काळे यांचीही या पदावर नियुक्ती झाली आहे.

tata ev ads

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या पदोन्नतीची मागणी केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी पदोन्नतीच्या रिक्त जागांवर नियुक्त्या करण्यात आल्याचे संघाचे राज्य अध्यक्ष केशवराज जाधव, जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे यांनी सांगितले.

24K KAR SPA ads

पदोन्नतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी संजय काळे, तसेच कक्ष अधिकारी राजेश खंदारे, शिल्पा रासकर, अनिल रंधावे, संध्या केदारी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया राबविल्याबद्दल संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांचे आभार मानण्यात आले.

उच्च न्यायालयाने याबाबत दाखल याचिकेची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या आदेशातील अंतिम निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने 7 मे 2021 च्या शासन निर्णयातील पदोन्नती बाबतच्या मार्गदर्शक तरतुदींच्या अधीन राहून शिक्षक मुख्याध्यापकांना विस्तार अधिकारी पदावर नियुक्त्या केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar


dainik maval ads

Previous Post

PHOTO : पाणीच पाणी चहूकडे… वडगाव मावळ शहराला मुसळधार पावसाने झोडपले । Vadgaon Maval Rain

Next Post

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून एकाने इंद्रायणी नदीत उडी मारली । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
man jumped into Indrayani river from British-era bridge in Indori Maval

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून एकाने इंद्रायणी नदीत उडी मारली । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sant Tukaram Maharaj Palkhi will arrive at Sant Dnyaneshwar Maharaj Temple in Alandi on Sunday

तुकोबा येत आहेत, माऊलींच्या भेटीला !! आळंदी देवस्थानचे निमंत्रण देहू देवस्थानने स्वीकारले, १७ वर्षांनंतर प्रथमच असे घडणार

July 17, 2025
Crime

उर्से घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद, पंचवीस लाखांचे दागिने व मुद्देमाल हस्तगत । Maval Crime

July 17, 2025
Animal husbandry business to be given agricultural business status

पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा ; मावळ पोल्ट्री योद्धा संघटनेकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

July 17, 2025
dog

तळेगाव दाभाडे शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत ; भटक्या श्वानांची वाढती संख्या चिंतेची बाब । Talegaon Dabhade

July 17, 2025
CM Devendra Fadnavis

‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला, बालकांचा शोध घेण्यात यश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2025
Roads under Chief Minister Gram Sadak Yojana will henceforth be made of cement concrete

ग्रामीण भागातील रस्ते होणार टिकाऊ ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रिटीचे करण्यात येणार

July 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.