Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. यातही ग्रामीण भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. डोंगर दऱ्यांचा प्रदेश असलेला मावळ तालुका सध्या मान्सूनच्या तडाख्यात असून मुसळधार पावसाने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागलेत.
मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण परिसरात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी (दि. २२) सायंकाळी चार वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरण परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाची संततधार असल्याने धरणात पाण्याचा येवा वाढून पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या हफ्त्यापासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सद्यस्थिती पवना धरणात ४५.०८ टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती धरण विभागाचे रजनीश बारिया यांनी दिली. यासह धरणात पाण्याचा येवा असाच सुरू राहिल्यास लवकरच धरण पन्नाशी पार होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime