Dainik Maval News : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात गावागावात क्रीडा सुविधा उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक गावात १० लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवण्यास क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजुरी दिली.
राज्य क्रीडा विकास निधी सनियंत्रण समितीची बैठक क्रीडा मंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे, अशा सर्व शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध विभागांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा, आश्रमशाळा, वसतीगृहे यांना हे क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच एकविध खेळाच्या क्रीडा संघटन, खासगी क्लब, क्रीडा मंडळे, युवक मंडळ, महिला मंडळे यांनाही १० लाखापर्यंतचे क्रीडा साहित्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके