व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत (पीएम-जेएवाय) पुणे जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये हे आयुष्मान योजनेचे कार्ड काढलेल्या रुग्णांना लाभ देत नाहीत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
Ayushman Bharat scheme

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत (पीएम-जेएवाय) पुणे जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये हे आयुष्मान योजनेचे कार्ड काढलेल्या रुग्णांना लाभ देत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे केली आहे. त्यावर या रुग्णालयांची तत्काळ माहिती घेण्याचे आदेश नड्डा यांनी सचिवाला दिले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना मदत न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होईल, असे बारणे यांनी सांगितले.

याबाबत खासदार बारणे यांनी दिल्लीत मंत्री नड्डा यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजनेत असलेल्या १४८ रुग्णालयांची माहिती दिली. या योजनेत आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याची मागणी केली. खासदार बारणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने २३ सप्टेंबर २०१८ पासून देशभरात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) राबविण्यात आली आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे हा योजनेचा उद्देस आहे. या योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) आता ७० वर्षे वयोगटातील वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात १६८ खासगी रुग्णालयापैकी ठरावीक रुग्णालये या योजनेअंतर्गत सेवा देत आहेत. उर्वरित रुग्णालये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार करणार नसल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांवर उपचार करण्यास नकार देत आहेत. ही परिस्थिती केवळ केंद्र सरकारच्या आदेशांचे उल्लंघन नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हक्कांचे उल्लंघन आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर योग्य वैद्यकीय सुविधा मिळू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात येते. त्यांना वैयक्तिक खर्चाचा मोठा भार सहन करावा लागतो. ही योजना जाणूनबुजून राबवत नसलेल्या सर्व रुग्णालयांवर आवश्यक कायदेशीर कारवाई करावी. पुणे जिल्ह्यातील सर्व सूचीबद्ध रुग्णालयांना ही योजना सक्तीने राबवण्यासाठी आवश्यक सूचना तात्काळ द्याव्यात. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सुलभ आणि त्रासमुक्त पद्धतीने उपचार उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी एक देखरेख यंत्रणा स्थापन करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख तर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. त्यामुळे अनेक रुग्णालये मदत देण्याचे टाळतात. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. ही योजना अतिशय चांगली आहे. प्रत्यक्षात रुग्णालये ज्येष्ठांना योजनेचा लाभ देत नाहीत. याची चौकशी करुन अशा रुग्णालयांवर कारवाईची ग्वाही त्यांनी दिली आहे. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


Previous Post

मावळ तालुक्यातील सांगवडे, गहुंजे या दोन गावांसह ‘ही’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेण्याची मागणी

Next Post

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand to declare a wet drought in Maval taluka Statement to Tehsildar

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.