व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

एसआयटी नेमून आमदार सुनील शेळके यांच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
MLA Sunil Shelke embezzled royalties MP Sanjay Raut makes allegations sends letter to CM

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत खासदार राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठविले आहे. सोबत एसआयटी नेमून आमदार सुनील शेळके यांच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काय आहे पत्रात, वाचा जसेच्या तसे –
“प्रिय देवेंद्र फडणवीसजी
जय महाराष्ट्र!
विषय : आपल्या सरकारला समर्थन देणारे आमदार श्री. सुनील शंकरराव शेळके (मावळ) यांनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्या संदर्भात,
मुख्यमंत्री महोदय,
भ्रष्टाचार व जनतेची फसवणूक वगैरे विषयांवर आपण नेहमीच बोलत असता. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू असे आपले धोरण आहे. प्रत्यक्षात राज्यातले चित्र नेमके उलटे आहे. कुंपणच शेत खात असून शेत खाणाऱ्यांना सरकारचे अभय असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या सभोवती असलेले लोक सरकारला पाठिंबा देण्याची किंमत वसूल करण्यासाठी सरकारी तिजोरीवरच दरोडे टाकीत आहेत. मावळचे सन्मानीय आमदार सुनील शंकरराव शेळके (उपमुख्यमंत्री अजित पवार गट ) यांनी सरकारच्या केलेल्या लुबाडणुकीचे प्रकरण माझ्या समोर आले. पुढील कारवाईसाठी मी ते आपल्याकडे पाठवीत आहे.”

“मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी, औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४, गाव मौजे आंबळे येथील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. आय डी सी – २०२० / प्रक्र ५८८) उ. १४ दि. २२/०४/२०२१ द्वारे जाहीर केले आहे. गाव मौजे आंबळे येथे रस्ते, पाणी, वीज, वाहतूक व्यवस्था इत्यादी उपलब्ध असून दळण-वळणासाठी तळेगावचे औद्योगिक क्षेत्र, चाकण, पुणे व मुंबई यांना जोडणारे रस्ते आहेत. तसेच सदर भूसंपादनाने आंबळे व नजीकच्या गावांमधील तरुणाईस रोजगार उपलब्ध होत असून या गावाच्या विकासासाठी खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच सदर गावात व त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. तसेच तेथे जवळपास १०० फुटांचे खोल मोठे खड्डे केलेले आहेत. सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नसल्याने सर्व खाणीचे गट हे प्रथमदर्शनी सदर राजपत्रामध्ये खाणीच्या जमिनी वगळण्यात आल्या आहेत.”

“तरी सुनील शंकरराव शेळके, आमदार मावळ यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून सदर औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथील श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या गट क्र. १२३, १२५, १४९,१५२,१५३/१,१५४,१५८, १७१ / २ व १९५ अशा २९ हेक्टर ८६.१० आर क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत व तसेच श्री. सुनील शंकरराव शेळके, आमदार मावळ यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे, त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही.”

“त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांचे बंधू श्री. सुदाम शंकरराव शेळके यांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जानुसार संपादन जागेच्या बदल्यात पर्यायी क्षेत्र मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेली होती. परंतु वरील सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केलेले आहे. जवळजवळ १०० फुटांचे खोल मोठे खड्डे केलेले आहेत.”

“सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नाही. असे असतानादेखील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय ( १९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करून त्याबदल्यात आंबळे गावाच्या गट क्र. १३८. १४०/१,१४०/२,१४२/२ या जमिनींचे क्षेत्र २९ हेक्टर ८६. १० आर पर्यायी क्षेत्र देत आहेत. याबाबत तसा प्रस्तावदेखील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. आज रोजी दगडखाण केलेल्या बऱ्याच जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर झालेल्या आहेत.”

“तसेच खालील मुद्दयांचा तपास करण्यात यावा.
१. मा. मुख्यमंत्री महोदय या माध्यमातून श्री. सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडविलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? त्याबाबत आपल्या मार्फत त्वरित आदेश देण्यात यावेत.
२. भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांची राहती घरे व बागायती जमिनी आपण घेता, त्यांना कधीही आपण बदली जमिनी दिल्या नाहीत, त्यांना हा न्याय का नाही? अशा अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन रक्कम स्वीकारलेली आहे, ती परत घेऊन त्यांना बदली जमीन देणार का? बदली जमिनीचा न्याय फक्त आमदार या नात्याने श्री. सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनाच आहे का? त्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या संपादनामध्ये आलेल्या जमिनी आपण घेतलेल्या नाहीत. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?”

“३. श्री. सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्खनन करताना त्या जमिनीमधून असणारे मुख्य गाव रस्ते फोडले आहेत, ग्रामस्थांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत शासनाकडून श्री. सुनील शेळके यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात आलेला नाही.
४. या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी सहभागी आहेत. त्याचीदेखील चौकशी आपल्या कार्यालयामार्फत करण्यात यावी.
५. बेकायदेशीर उत्खनन हा सर्व रॉयल्टी बुडविण्याचा प्रकार गौण खनिज अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने होत आहे. त्यांचीदेखील सखोल चौकशी करून आपल्या कार्यालयामार्फत त्याची दखल घेण्यात यावी.
६. आंबळे, ता. मावळ येथील संपादनासाठी सहा वर्षांपासून शिक्के असलेल्या जमिनी घेतल्या जात नाहीत व श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांचे बंधू श्री. सुदाम शंकरराव शेळके व त्यांचे कुटुंबीय यांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जाची कार्यवाही एका वर्षाच्या आतच केली गेली. श्री. सुनील शंकरराव शेळके यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हजारो कोटी रॉयल्टी बुडवली आहे. ७३ लाख एकर या भावाने जमिनी घेऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने २ कोटी ५० लाख एकरी दराची बदली जमीन देणे योग्य आहे का?”

“सदर बेकायदेशीर उत्खनन केलेल्या सर्व क्षेत्राची मोजणी करून संपूर्ण रॉयल्टी दंडासह वसूल करण्याबाबतचे आदेश आपल्या कार्यालयामार्फत देण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संपादनासाठी काढलेली अधिसूचना त्वरित रद्द करावी व संबंधितांवर त्वरित फौजदारी कार्यवाही करावी. या भ्रष्टाचाराबाबतचे सर्व कागदोपत्री पुरावे सोबत जोडले आहे.
मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याची लूट कशा पद्धतीने सुरू आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. पैशाअभावी राज्यातील अनेक योजना रखडल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, पण शेळकेंसारखे आमदार सरकारची लूट करून गब्बर झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करावाच, पण ‘एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेशही द्यावेत. ही नम्र विनंती.”

असे पत्र खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. तसेच याची एक प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविली आहे. खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे पत्र पोस्ट केले आहे.

मा.मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस जी,
काय सुरू आहे महाराष्ट्रात?
थांबवा ही लुटमार!
⁦@Dev_Fadnavis⁩
⁦@cbawankule⁩
⁦@AjitPawarSpeaks⁩
⁦@PMOIndia⁩
⁦@AmitShah⁩ pic.twitter.com/ClGyjIXF43

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक


dainik maval jahirat

Previous Post

देहूगाव : लोणारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न । Dehu News

Next Post

पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana Dam

पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.