व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले, पण हे कुणालाही मान्य नव्हते’ – खासदार श्रीरंग बारणे

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 10, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
MP-Shrirang-Barne

Photo : Twitter / MP Shrirang Barne


चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा ( Balasahebanchi Shivsena Party ) पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहर जिल्हा पदाधिकारी आणि पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले. ( Balasahebanchi Shivsena Pimpri Chinchwad Maval MP Shrirang Barne )

‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विचार सर्वांपर्यंत पोचवण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची आगामी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढून जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मित्र पक्ष भाजपसह आमची महापालिकेत सत्ता येईल’, असा विश्वास यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय म्हणाले बारणे?

‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी पक्षवाढीसाठी जोमाने काम करतील. पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढवले जाईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या निर्णयांचा तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे पदाधिकारी करतील.’

‘सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, आत्मविश्वासाने काम करावे, कोणावर टीका-टिप्पणी करू नका, त्यात वेळ घालवू नका. विधायक कामावर भर द्यावा. सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून काम करावे. जे सोबत येतील. त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. तिकडे राहिलेले लोकही इकडे येतील, एवढा आत्मविश्वास ठेवून काम करावे. यापूर्वी कोणतीही समिती, महामंडळावर संधी मिळाली नाही. पण, यापुढील काळात नक्कीच चांगले काम करण्याची संधी मिळेल. आपल्या हक्काचे सरकार आहे.’

हेही वाचा – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर, पाहा यादी

मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ,पिपरी,चिंचवड विधानसभा पदाधिकारी नियुक्त्या व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा ॲटो कल्टर पिंपरी येथे आज@MPShrirangBarne यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. @CMOMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde @Sanjaymore9048 @nareshmhaske pic.twitter.com/Fhc6IiZrGZ

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) December 7, 2022

‘शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढतो. युती म्हणून लोकांनी एका भावनेने, विचाराने मतदान केले. पण, लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले. पण, हे कोणालाही मान्य नव्हते. लोकांची भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली. परंतु, दखल घेतली नाही. त्यामुळे उद्रेक झाला. जनतेची कामे करण्यासाठी ताकद मिळत नव्हती. पण, आपला कोणाविरोधात राग नाही, द्वेष नाही’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा उपनेते श्रीरंग बारणे मेळाव्यात बोलताना म्हणाले. ( Balasahebanchi Shivsena Pimpri Chinchwad Maval MP Shrirang Barne )

अधिक वाचा –

– इंदोरीचे उपसरपंच ते मावळचे दोनवेळा आमदार; वाचा दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास । Digambar Bhegade Death
– मावळ ॲग्रोच्या वतीने सोमवारपासून अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! 13 डिसेंबरपर्यंत पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या 10 फेऱ्या बंद, पाहा यादी

Next Post

पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ink-Throw-BJP-Leader-Chandrakant-Patil

पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.