Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज, शुक्रवार (दि. 25 जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ रस्त्यालगत असलेल्या दरडीचा काही भाग दगड, माती, झाडी कोसळली होती. यामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक ठप्प होऊन मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आयआरबी, वाहतूक पोलीस, हेल्प फाउंडेशन आदी यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्ध पातळीवर रस्त्यावरी मलबा दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले. यादरम्यान साधारण साडेपाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा मुंबई मार्गिकेवर लागल्या होत्या.
साधारण दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर संपूर्ण मार्गिकेवरील मलबा हटविण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान गेल्या 24 तासांपासून घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यांलगत असणारी धोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची स्थिती आहे, परंतु या सर्व ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याने प्रवाशांना धोका नाही. तरीही मार्गावरून प्रवास करताना सावध आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सात ते आठ वर्षापूर्वी खंडाळा घाट परिसरामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. त्यानंतर या सर्व परिसरामध्ये सुरक्षा करता जाळ्या लावण्यात आल्या आहेत, तेव्हापासून दरड रस्त्यावर येण्याचे प्रकार थांबले आहेत. आजच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात दगड गोटे जरी रस्त्यावर आले नसले तरी डोंगराची माती ही घसरून रस्त्यावर आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पवन मावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 83 टक्के भरले, अकरा वाजता धरणाचे दरवाजे उघडणार
– वडगावात यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव? नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे सामुहिक निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
– रोजगार हमी योजनेला नवे बळ ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीची सक्रिय बैठक संपन्न । Maval News
– व्हिडिओ : मावळ तालुक्यातील गणपतीचे गाव असलेल्या शिळींब येथील गणेशमूर्ती कारखान्यांत कारागिरांची लगबग !