व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल ! महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी उभारणार ‘उमेद मॉल’

ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या (SHG) विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
self-help groups mahila bachat gat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

  • ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या (SHG) विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यात विस्तारली जाणार आहे.

प्रत्येक उमेद मॉलसाठी कमाल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे मॉल जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारण्यात येतील. मॉलमध्ये प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील. महिलांना संवाद आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा देखील असेल.

उमेद मॉलसाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवले जातील. ज्या जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलसाठी जमीन उपलब्ध असेल आणि ती मध्यवर्ती ठिकाणी असेल, त्या जिल्ह्यांची निवड केली जाईल.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया, आराखडे तयार करणे, कामाची अंमलबजावणी केली जाईल. उमेद मॉलची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप


dainik maval jahirat

Previous Post

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा ! तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरावर राबविणार अभियान

Next Post

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Agriculture farmers damage to agricultural goods damaged farmers agricultural damage

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.