व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कॅन्टोन्मेंट बोर्ड नको, नगरपरिषद हवी ! देहूरोड नगर परिषदेच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांचा भव्य मोर्चा । Dehu Road

स्वतःचे शहर, स्वतःचा हक्क, कॅन्टोन्मेंट हटवा, नगर परिषद द्या, अशा घोषणा देण्यात आल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
No Cantonment Board want Nagar Parishad Dehu Road Citizens hold grand march to demand Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूरोड शहर कॅन्टोन्मेंट कृती समितीच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर विविध स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रविवारी (दि. 10 ऑगस्ट) सकाळी देहूरोड बाजार पेठेतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘कॅन्टोन्मेंट हटाव, देहूरोड बचाव’ अशा घोषणा देत मोर्चा देहूरोड येथील शंकर मंदिरापासून सवाना चौक, वृंदावन चौक, भाजी मंडई, सुभाष चौक मार्गे उड्डाण पुलाखालील स्वामी विवेकानंद चौकात आला.

यावेळी देहूरोड बाजार पेठेतील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी, स्थानिक नेते, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.

स्वतःचे शहर, स्वतःचा हक्क, कॅन्टोन्मेंट हटवा, नगर परिषद द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. दीपक चौगुले, रमेश जाधव, कैलास गोरवे, अरविंद गायकवाड, शनराज शिंदे, शीतल हगवणे, गोपाळ तंतरपाळे, कृष्णा दाभोळे, रघुवीर शेलार, बाबा हाजीमलंग आदींनी आपला रोष व्यक्त केला.

कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले, की देहूरोड कॅन्टोन्मेंट भागात नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून देहूरोडला स्वतंत्र नगर परिषद म्हणून मान्यता मिळावी, केंद्र सरकारने राज्य सरकारला नगर परिषद होणे कमी सूचना कराव्यात आदी मागण्या केल्या.

यावेळी यासंदर्भातील माणग्यांचे निवेदन संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले. देहूरोड शहर कॅन्टोमेंट कृती समितीने इशारा दिला आहे, की लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आंदोलनास भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर


Previous Post

मावळच्या मातीतला पैलवान हरपला ! पुणे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पैलवान चंद्रकांत सातकर यांचे निधन । Chandrakant Satkar Passes Away

Next Post

Ranbhajya in Maval : मावळात रानभाज्यांना बहर ! श्रावण मासात मांसाहार विसरायला लावणाऱ्या विविध रानभाज्यांची मेजवानी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ranbhajya in Maval

Ranbhajya in Maval : मावळात रानभाज्यांना बहर ! श्रावण मासात मांसाहार विसरायला लावणाऱ्या विविध रानभाज्यांची मेजवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.