व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा - दिनेश वाघमारे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 15, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Maharashtra State Election Commission

File Image


Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्टॉनिक मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्मरितीने पूर्वनियोजन करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक पूर्व तयारी संदर्भात वाघमारे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 650 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूका होणार आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निवडणूका होत असल्याने सर्वांची जबाबदारी मोठी आहे. निवडणुकीची पूर्वतयारी करतांना मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान यंत्रे आणि मतदार जनजागृती या चार बाबींवर विशेष लक्ष द्यावे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करावे. मतदार यादी अचूक असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असली तरी मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निकषाद्वारे मतदान केंद्रांचे एकत्रिकरण करता येईल. सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी.

प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार मतदान यंत्रांची मागणी नोंदवावी. राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत करार केला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करुन दिली जातील.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल. मात्र, त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपलब्धता, संभाव्य मतदान केंद्रे आणि तेथील सोईसुविधांची उपलब्धता यांचाही आढावा घ्यावा, असे श्री. वाघमारे म्हणाले. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

श्री. काकाणी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करुन ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावीत. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात. मतदान केंद्रांच्या जुजबी दुरुस्त्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरावा. मतदान केंद्राची जागा निश्चिती, मतदान केंद्र इमारतींची स्थिती, तेथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी; तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सन 2011 च्या जनगणनेनुसार त्यावेळची लोकसंख्या, आताची संभाव्य लोकसंख्या, मागील निवडणूकीवेळी असणारे मतदान केंद्रे, संभाव्य मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, मतदार यादी विभाजनाचे नियोजन आदींबाबतची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यापूर्वी मॉक पोल घ्यावा, तसेच खाजगी जागेतील मतदान केंद्रांच्या याद्यांना पूर्वप्रसिद्धी द्यावी अशा सूचनाही डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली तर महापालिका आयुक्तांनी तेथील महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
– पोरांनो… तयारीला लागा ! महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प पाहणी ; लाभार्थ्यांशी थेट संवाद


dainik maval jahirat

Previous Post

फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

Next Post

सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Document registration Dast Nondani

सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.