व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी

‘आयटीएमएस प्रोटेक सोल्युशन्स’ हे ‘आयटीएमएस एलएलपी’द्वारे चालवले जाते, जे प्रति चलन (जीएसटीसह) ६५४.९० रुपये कमवते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 17, 2025
in महाराष्ट्र
Vehicles on Mumbai-Pune Expressway E-challan worth Rs 450 crore issued through ITMS system

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील सर्वात व्यस्त मार्ग आहे. या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. गेल्यावर्षी या द्रुतगती महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ लागू करण्यात आली आहे. या यंत्रणेने ४७० कोटी रुपयांचे २७.७६ लाख ‘ई-चलन’ जारी केली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ५१ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने सांगितले की, देशातील ९५ किमी लांबीच्या या महामार्गावर वाहतुकीचे काटेकोर पालन होण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी एआय-चलित कॅमेरे आणि डिटेक्शन टूल्स असलेली ही प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीद्वारे निश्चित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांना ‘ई-चलन’ जारी करण्यात येते.

या प्रणालीमुळे दंड झालेल्यांमध्ये कार चालवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांना १७.२० लाख ‘ई-चलन’ जारी करण्यात आले असून यात वेगमर्यादेच्या उल्लंघनासाठी सर्वात जास्त दंड ठोठावण्यात आले आहेत.

‘आयटीएमएस प्रोटेक सोल्युशन्स’ हे ‘आयटीएमएस एलएलपी’द्वारे चालवले जाते, जे प्रति चलन (जीएसटीसह) ६५४.९० रुपये कमवते. जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान जारी केलेल्या ८.८४ लाख ‘ई-चलनां’साठी ऑपरेटरला आधीच ५७.९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

खंडाळा घाट विभागात सर्वाधिक वेगमर्यादा दंड आकारण्यात आला आहे. जिथे कारसाठी वेगमर्यादा ताशी ६० किमी आणि जड वाहनांसाठी ४० किमी आहे. द्रुतगती महामार्गाच्या अन्य भागांत लहान वाहनांसाठी ही मर्यादा ताशी १०० किमी आणि जड वाहनांसाठी ताशी ८० किमी आहे.

वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, घाटात सध्याची मर्यादा खूपच कमी आहे. लोणावळा आणि खालापूर दरम्यानच्या १० किमीच्या उतारावर जड वाहनांना नियंत्रण राखणे कठीण होते. दरम्यान, पुणे-मुंबई मार्गावर घाटात जड वाहनांसाठी मर्यादा ४५-५० किमी प्रतितासपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.

‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ म्हणजे काय ?
‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’मध्ये ४० गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड डिटेक्शन कॅमेरे, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन वेट-इन-मोशन सेन्सर्स, वाहन वर्गीकरण प्रणाली, हवामान सेन्सर्स आणि डायनॅमिक मेसेजिंग सिस्टम सेंट्रल कमांड अँड कंट्रोल सेंटर यांचा अंतर्भाव आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी


Previous Post

बेबडओव्होळ ते निगडी पीएमपीएमएल बसचा शुभारंभ ; खासदार श्रीरंग बारणे यांनी दाखविला हिरवा झेंडा

Next Post

शासन मालकीच्या चिंचोळ्या, अयोग्य आकाराच्या, लँड लॉक्ड भुखंडाच्या वितरणाचे धोरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Policy for distribution of small irregularly shaped land-locked land owned by the government

शासन मालकीच्या चिंचोळ्या, अयोग्य आकाराच्या, लँड लॉक्ड भुखंडाच्या वितरणाचे धोरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.