व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक

कामगारांच्या सोयीसाठी PMPL बससेवा शिंदे वासुलीपर्यंत वाढविण्याचा ठोस निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 23, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Important decisions for development of Talegaon MIDC TDIA meeting in presence of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन (TDIA) ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस TDIA अध्यक्षा अनु सेठी, उपाध्यक्ष जगदीश यादव, तसेच तळेगाव MIDC पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांच्यासह नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस पावले उचलण्यात आली तळेगाव MIDC परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. यासाठी ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, ह्युंदाई कंपनीलगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण तसेच इतर प्रलंबित रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या . चाकण–शिंदे वासुली व शिंदे वासुली–पॉवर हाऊस मार्गावरील प्रलंबित रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार शेळके यांनी थेट सूचना दिल्या. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे कामगारांच्या सोयीसाठी PMPL बससेवा शिंदे वासुलीपर्यंत वाढविण्याचा ठोस निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे MIDC भागात काम करणाऱ्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MIDC मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत आमदार सुनील शेळके यांनी ठोस भूमिका घेतली. “उद्योगांच्या प्रगतीसाठी सततचा वीज पुरवठा आवश्यक आहे, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे हे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असे ते यावेळी स्पष्टपणे म्हणाले.
बैठकीस उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या CSR फंडातून मावळ तालुक्यातील सामाजिक व विकासकामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार शेळके यांनी CSR फंडातील रक्कम स्थानिक विकासासाठी वापरण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला.

या बैठकीस एफ.ई.व्ही इंडिया, एलअँडटी डिफेन्स, इमर्सन प्रा. लि., हुसको हायड्रॉलिक्स, अॅटलास कोपको, ओगनिबेनी इंडिया लि., पॉस्को आयपीपीसी प्रा. लि., चिकात्सो इंडिया, शेफ्लर इंडिया, के.एस.एच प्रा. लि., ए.एम लाइटिंग, बोर्गवॉर्नर इंडिया, व्हिटेस्को टेक्नॉलॉजी, एस.एच. पिटकर ऑर्थोटूलिंग, विनोआ २ एफी आदी नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

TDIA च्या या बैठकीत घेतलेले निर्णय उद्योग क्षेत्राचा विकास, वाहतूक व्यवस्था सुधारणा, वीज पुरवठा स्थैर्य आणि स्थानिक कामगार व समाजाच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.या सर्व निर्णयांमध्ये आमदार सुनील शेळके यांची सक्रिय भूमिका आणि पुढाकार उद्योगनगरीच्या प्रगतीला नवी गती देणारा ठरणार आहे, असे सर्वांचे एकमत झाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध ; हरकती व सूचनांसाठी ३१ तारखेपर्यंत मुदत । Talegaon Dabhade
– पुणेकरांना वाहतूककोंडीतून अल्प दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण


dainik maval jahirat

Previous Post

मोठा निर्णय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 48) बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Next Post

आगमनापूर्वीच गणरायाचा भक्तांना आशीर्वाद ! गणेशोत्सवाला गावी जाताना वाहनासाठी टोल भरावा लागणार नाही

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ganpati-Bappa-Photo-Image

आगमनापूर्वीच गणरायाचा भक्तांना आशीर्वाद ! गणेशोत्सवाला गावी जाताना वाहनासाठी टोल भरावा लागणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.