Dainik Maval News : लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने दोन दिवसांत बाजारपेठ भागात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या तब्बल २२० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात एक लाख ८१ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
लोणावळा शहरात बाजार परिसरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत बदल करत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जयचंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकादरम्यान पोलिसांच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचे रस्ता दुभाजक लावण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनंतर ते काढण्यात आले.
वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने उभ्या करण्यात आलेल्या २२० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नियमित सुरू असलेल्या कारवाईप्रमाणेच ही कारवाई सुरू असून, नागरिकांनी वाहतुकीची शिस्त व नियम पाळावेत, असे आवाहन लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघारे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या, पाहा संपूर्ण नियोजन
– तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक
– मोठा निर्णय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 48) बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
