व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 5, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
Special review meeting held at PMRDA office regarding Indrayani and Pawana River Pollution Control Project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेत यासंबंधी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंद्रायणी आणि पवना नदी पुन्हा स्वच्छ, निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

नदी पात्रात थेट येणारे सांडपाणी रोखण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी, नाल्यांमधून नदीकडे जाणाऱ्या दूषित पाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी यासह इतर दूषित पाण्यासाठी सांडपाणी प्रकल्प केंद्राच्या (STP) उभारणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. इंद्रायणी आणि पवना नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांच्या अनुषंगाने पुढील ३० वर्षाचे नियोजन करून प्रकल्पाची आखणी करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बैठकीत दिले.

सांडपाणी प्रकल्प केंद्राच्या उभारणीसह नदी किनाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच नदी पात्रात दूषित पाणी सोडणाऱ्या सोसायट्यांसह संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची सूचना यावेळी आमदार महेश लांडगे यांनी केली.

या बैठकीस मुख्य अभियंता रिनाज पठाण, सह महानियोजनकार श्वेता पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, अध‍िक्षक अभ‍ियंता प्रशांत पाटील, कार्यकारी अभ‍ियंता अन‍िता कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation

Next Post

भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला गती ; मुख्यमंत्र्यांकडे होणार बैठक । Pimpri-Chinchwad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhakti-Shakti to Chakan Metro project gets momentum CM to hold meeting Pimpri-Chinchwad

भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला गती ; मुख्यमंत्र्यांकडे होणार बैठक । Pimpri-Chinchwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.