व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन । Talegaon Dabhade

नव्या विधी महाविद्यालयामुळे मावळात कायदेतज्ज्ञ तयार होतील - आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 8, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Late Adv Ku Shalaka Santosh Khandge Law College inaugurated at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कायद्याचे शिक्षण हे समाजाच्या न्यायव्यवस्थेचा पाया आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश‌ गोसावी यांनी व्यक्त केले. कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या समर्थ शैक्षणिक संकुल येथे कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी न्याय, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांच्या मूल्यांवर आधारित कारकीर्द घडवावी, असे प्रमुख अतिथी प्रा. डॉ.गोसावी म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे अभियोग संचालनालयचे संचालक अशोककुमार भिल्लारे, प्र – कुलगुरू, डॉ. पराग काळकर, मावळचे आमदार सुनिल (आण्णा) शेळके, मानव विद्याशाखेचे डीन डॉ. विजय खरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे मा. अध्यक्ष, ॲड.राजेंद्र उमाप, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित होते.

तसेच खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, तसेच संस्थेचे संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शहा, चंद्रकांत शेटे, सोनबा गोपाळे, विनायक अभ्यंकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलास पौळ, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, नामदेव दाभाडे, दिपक हुलावळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड. राजेंद्र उमाप म्हणाले की,कायद्याचे शिक्षण किंवा पदवी घेतल्यानंतर समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकांनी बजावली पाहिजे. यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनिल शेळके म्हणाले की, तळेगाव दाभाडे हे तालुक्याचे शैक्षणिक हब बनलेले आहे त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे विधी महाविद्यालयामुळे नक्कीच जास्तीत जास्त कायदेतज्ञ तयार होतील.

अध्यक्षीय मनोगतात संजय तथा बाळा भेगडे म्हणाले की, पुढील काळात विधी महाविद्यालयाचे महत्व वाढेल विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना समाजव्यवस्थेला कोर्ट कचेरी पासून कसे दूर ठेवता येईल अशी व्यवस्था निर्माण करावी. या विधी महाविद्यालयात राष्ट्राला अपेक्षित कायदेतज्ञ तयार होतील. यावेळी डॉ. विजय खरे, डॉ. पराग काळकर,मा. श्री. अशोक भिल्लारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

महाविद्यालयात आधुनिक वर्गखोल्या, समृद्ध वाचनालय, संगणक प्रयोगशाळा तसेच मूट कोर्ट रूमची सुविधा उपलब्ध आहेत याची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव व विधी महाविद्यालयाच्या कार्यकारणी समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केले, सुत्रसंचालन सुनिल बोरुडे व बापुसाहेब पवार यांनी केले आभार संस्थेचे संचालक श्री. विनायक अभ्यंकर यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर


Previous Post

इंदोरीच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय प्रवास ; प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून दुहेरी विजेतेपदाची मोठी कामगिरी !

Next Post

अखंड मराठा समाजातर्फे मावळ तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान ; मराठा समाजासाठी स्वतंत्र भवन उभारण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Akhand Maratha Samaj honors meritorious Students people of Maval taluka

अखंड मराठा समाजातर्फे मावळ तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान ; मराठा समाजासाठी स्वतंत्र भवन उभारण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.