व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी

वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, दिनांक 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 8, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election All political parties should strictly follow the code of conduct

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. उमेदवार व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून या निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले.

वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, दिनांक 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दिनांक 17 पर्यंत अखेरची मुदत असून, दिनांक 18 रोजी छाननी होणार आहे. तर 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. दरम्यान, नामनिर्देशन पत्र स्वीकारणे छाननी प्रक्रिया तसेच मतमोजणी प्रक्रिया नगरपंचायत कार्यालयातच होणार असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेसाठी 24 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये केशवनगर जिल्हा परिषद शाळा, कातवी येथील जिल्हा परिषद शाळा, पंचायत समिती आवारातील जिल्हा परिषद शाळा व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूल शाळा, रमेश कुमार सहानी इंग्लिश स्कूल व पोतदार इंग्लिश स्कूल या ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे असून, मूळ प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. अर्जासोबत शपथपत्र, स्वयंघोषणा पत्र, थकबाकी नसलेला दाखला, गुन्हेगारी नसलेला दाखला, जन्म तारखेचा पुरावा, मालमत्तेचे विवरण, शौचालय असल्याचा दाखला, नगरपंचायत ठेकेदार नसल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक खर्चासाठी बँकेचे खाते, आरक्षित जागेसाठी जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र व ते नसल्यास वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची प्रत आदी कागदपत्रे जोडून उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू केली असून, आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून शहरातील सुमारे 24 होर्डिंग्ज, 161 फ्लेक्स काढून टाकण्यात आले असून, नामफलक, पाट्या, बोर्ड झाकण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांकडून आचारसंहिता काळात पत्रके वाटणे, भेटवस्तू वाटणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी करून प्रलोभने दाखवणे यावर निवडणूक यंत्रणेचे लक्ष असून त्यासाठी मीडिया सेलची नेमणूक करण्यात आलेली आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास सबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये धरण्यात येणार असल्याचेही डॉ. निकम यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण 


dainik maval jahirat

Previous Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर

Next Post

ब्युटी पार्लरचे काम मिळवून देतो असे सांगितले.. बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तळेगाव MIDC पोलिसांत गुन्हा दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

ब्युटी पार्लरचे काम मिळवून देतो असे सांगितले.. बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तळेगाव MIDC पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.