व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माऊ गावाजवळ दुचाकीचा अपघात, वीटभट्टीवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळलं दुःखाचं आभाळ

आंदर मावळ भागातील माऊ गावाच्या हद्दीत टाकवे-वडेश्वर रस्त्यावर बुधवार (14 डिसेंबर) रोजी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 16, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Accident

File Image


आंदर मावळ भागातील माऊ गावाच्या हद्दीत टाकवे-वडेश्वर रस्त्यावर बुधवार (14 डिसेंबर) रोजी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पप्पू दारकू हिलम ( वय 35, रा. वडेश्वर) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहादू शिंदे (वय 45 रा. वडेश्वर) यांनी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. ( One Killed Tn Two-Wheeler Accident On Takve Wadeshwar Road Near Mau Village Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 14 डिसेंबर रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पप्पू दारकू हिलम हि व्यक्ती मोटारसायकलवर (क्र. एम.एच. 12 एचएम 8412) मुळ गाव बेलजहून पुन्हा माघारी वडेश्वर येथे जात होती. त्यावेळी माऊ गावच्या हद्दीत वळणावर त्याचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पप्पू हिलम मोटारसायकलसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यात जाऊन पडला. यावेळी दगडावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला, यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

पप्पू हिलम हे वडेश्वर येथे एका वीटभट्टी कारखान्यावर वीट कामगार म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुले, आई, वडील, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. या सर्व परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे पप्पू यांच्या जाण्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले असून त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे या दुःखातून सावरण्यासाठी आणि प्रपंच चालवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

अधिक वाचा –

– सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक
– वरसोली, देवळे, कुनेनामा गावात पोलिसांकडून रूट मार्च; भयमुक्त होऊन मतदान करण्याचे मतदारांना आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक

Next Post

रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला अटक !

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rupali-Chakankar

रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.