Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक अन् प्रभावी उमेदवार आशाताई बाबुराव (आप्पा) वायकर आणि पंचायत समिती कार्ला गणाच्या उमेदवार रंजनाताई सुरेशशेठ (दादा) गायकवाड यांच्या सौजन्याने भव्य छकडी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी, सकाळी ७ वाजता कार्ला फाटा जवळील आयफील कॉलेज शेजारी, वेहेरगाव (तालुका मावळ) येथे ही भव्य स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.
स्पर्धेतील मेगा फायनल मधील प्रथम विजेत्यास टू – व्हीलर बाईक आणि इतर २ विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस तसेच, स्पर्धेतील प्रथम ५ विजेत्यांना ५१ हजार रुपयांचे आणि सेपरेट फायनल १० विजेत्यांसाठी रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
तसेच, घाटाचा राजा, १ ते ५ फळीफोड व १ ते १० फायनल विजेत्यास रोख रक्कम व बक्षिसे आणि कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटातील सहभागी प्रेक्षकांना आकर्षक लकी ड्रॉ मधून २१ सायकली जिंकण्याचीही संधी या स्पर्धेत असणार आहे.
या भव्य छकडी बैलगाडा शर्यत स्पर्धेत नक्की सहभागी व्हा आणि या स्पर्धेचा आनंद लुटा असे आवाहन आयोजक अक्षय बाबुराव (आप्पा) वायकर मित्रपरिवार आणि शुभम सुरेशशेठ (दादा) गायकवाड मित्रपरिवार यांच्याकडून करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
