Dainik Maval News : तळेगाव दाभाडे, चाकण आणि आळंदी नगरपरिषद निवडणूक २०२५ ची मतमोजणी रविवारी (दि. २१) पार पडणार आहे. मतमोजणी केंद्रांजवळ गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी प्रमुख मार्गांवरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
तळेगाव नगरपरिषदेची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नवीन नगरपरिषद इमारतीत; चाकण नगरपरिषदेची मतमोजणी चाकण मार्केट यार्ड समोरील मीरा मंगल कार्यालयात; तर आळंदी नगरपरिषदेची मतमोजणी आळंदी नगरपरिषद कार्यालयात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
हे वाहतूक निर्बंध दि. २१ डिसेंबर (रविवारी) रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.
तळेगाव शहर :
तळेगाव परिसरात जिजामाता चौक–तळेगाव स्टेशन चौक दरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. काळोखे वाडी, आदर्श विद्यालय गेट, वतननगर व हिंदमाता भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही निर्बंध असतील. या भागातील वाहतूक खांडगे पेट्रोल पंप, बेटी बचाओ सर्कल, मारुती मंदिर चौक, बीएसएनएल कॉर्नर, जुना मुंबई–पुणे महामार्ग, सिंडीकेट चौक आदी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
चाकण शहर :
चाकण गावठाण, महात्मा फुले चौकातून येणाऱ्या वाहनांना मार्केट यार्ड व मार्केट यार्ड चौकाकडे जाण्यास मनाई केली आहे. तसेच खेड बाजूकडून येणाऱ्या वाहनांना चाकण शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. पर्यायाने आंबेठाण पूल, नाशिक–पुणे महामार्ग मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
आळंदी शहर :
मरकळ, वडगाव घेणंद, देहुफाटा, योगिराज चौक, नगरपरिषद चौक परिसरात अनेक मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे, चाकण व आळंदीच्या दिशेने जाणारी वाहने वडगाव चौक, चाकण चौक, चाळीस फुटी रोड, जोग महाराज धर्मशाळा, मरकळ–वडगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

