व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण मार्गावर ओव्हरलोड रिक्षा आणि टेम्पोची भीषण धडक ; दोन प्रवासी जागीच ठार

चाकण - तळेगाव दाभाडे महामार्गावर महाळुंगे गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 20, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : चाकण – तळेगाव दाभाडे महामार्गावर महाळुंगे गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर होऊन दोन प्रवाशी जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रामसुंदर राम खिलावन साखेद (४७ वर्षे, सध्या रा. महाळुंगे इंगळे) व पिंटू राजन बिहारा (२५ वर्षे, महाळुंगे इंगळे) असे या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे (३६ वर्षे, रा. खराबवाडी ) व सागर मोहन मॉन्टी (२६ वर्षे, रा. खराबवाडी ) हे दोघे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणकडून औद्योगिक वसाहतीच्या महाळुंगे गावच्या दिशेने बारा प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात साखेद व पिंटू हे दोघे जागीच ठार झाले.

चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रिक्षांना केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना दहा ते पंधरा प्रवासी दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

नागरिकांनो, निर्भय होऊन मतदानाचा हक्क बजावा ! तळेगाव दाभाडे, लोणावळा येथे मतदानाला उत्साहात सुरूवात

Next Post

निकालाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव, चाकण, आळंदी परिसरात वाहतूक मार्गात मोठा बदल ; बातमी वाचूनच रविवारी घराबाहेर पडा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

निकालाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव, चाकण, आळंदी परिसरात वाहतूक मार्गात मोठा बदल ; बातमी वाचूनच रविवारी घराबाहेर पडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.