व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर । Vadgaon Nagar Panchayat

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांकडे उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातं.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 25, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर झाला आहे. दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आली असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे विजयी झाल्या आहेत, तर एकूण 17 नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हावरील 9 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता अंतिम निकालानंतर वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष कोण होणार, याची चर्चा होत आहे.

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे निवडून आलेले 9 नगरसेवक आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेल्या रुपाली अतुल ढोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा नगरसेवक झाले आहेत. या दहा नगरसेवकांपैकी सहा महिला असून चार पुरुष नगरसेवक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा नगरसेवक
पुनम विकी भोसले ( प्रभाग 1) सुनिता राहुल ढोरे ( प्रभाग 4) अजय महेंद्र भवार ( प्रभाग 7 ) माया अमर चव्हाण ( प्रभाग 8 ) आकांक्षा योगेश वाघवले ( प्रभाग 10 ) सुनील गणेश ढोरे ( प्रभाग 11 ) गणेश सोपान म्हाळसकर ( प्रभाग 12 ) अजय बाळासाहेब म्हाळसकर ( प्रभाग 13 ) वैशाली गौतम सोनावणे ( प्रभाग 14 ) आणि नुकताच प्रवेश केलेले अपक्ष उमेदवार रुपाली अतुल ढोरे ( प्रभाग 5 )

उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांकडे उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातं. परंतु नगराध्यक्षपदी महिला असल्याने पहिल्या टप्प्यात उपनगराध्यक्ष पदाची संधी ही पुरुष नगरसेवकाला मिळण्याची अधिक शक्यता आहे. या अर्थाने पुरुष नगरसेवकांमधील अजय महेंद्र भवार (प्रभाग 7), सुनील गणेश ढोरे (प्रभाग 11), गणेश सोपान म्हाळसकर (प्रभाग 12) आणि अजय बाळासाहेब म्हाळसकर (प्रभाग 13) ही नावे चर्चेत येतात. परंतु अनुभव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे सुनील गणेश ढोरे हे पुरुष नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्ष पदाचे प्रमुख प्रबळ दावेदार मानण्यात येत आहेत. त्या खालोखाल सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि जातीय समीकरण लक्षात घेता, अजय महेंद्र भवार यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

  • परंतु, लाडक्या बहिणींच्याच हाती सत्ता सुत्र देण्याचे जर पक्ष श्रेष्ठींनी निश्चित केले, तर उर्वरित सहा महिला नगरसेवकांच्याही नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होऊ शकते. या होऱ्यानुसार, उर्वरित सहा नगरसेवकांपैकी वडगावात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या पुनम विकी भोसले, एसटी प्रवर्गातून सर्वात प्रतिकूल परिस्थितीतून निवडून आलेल्या वैशाली गौतम सोनावणे किंवा सलग दोनदा नगरसेवक झालेल्या माया अमर चव्हाण यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.

परंतु पक्ष नेतृत्वाने धक्कातंत्र देत नवीन नेतृत्वाकडे सुत्रे सोपविण्याचे ठरविल्यास, बाजारपेठ भागातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या आकांक्षा योगेश वाघवले किंवा एक मताने विजयी होण्याचा चमत्कार करणाऱ्या सुनीता राहुल ढोरे अथवा पक्षविरोधात जाऊन निवडणूक लढवून विजय मिळविलेल्या आणि तात्काळ पक्षात प्रवेश केलेल्या रुपाली अतुल ढोरे यांच्याही नावापैकी एकावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

उपनगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले पाच प्रमुख नावे
सुनील गणेश ढोरे, अजय महेंद्र भवार, पुनम विकी भोसले, माया अमर चव्हाण, वैशाली गौतम सोनावणे

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश


dainik maval jahirat

Previous Post

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क ; हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे निर्देश

Next Post

नाताळ व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी सलग सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

नाताळ व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी सलग सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.