Dainik Maval News : महाराष्ट्र ही सांताची नव्हे कर संतांची भूमी आहे, असे मार्गदर्शन हभप कबीर महाराज अत्तार यांनी केले. मावळ तालुक्यातील कामशेत येथे श्री विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवाची सुरूवात गुरुवारी (दि. १) झाली. पहिल्याच दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कबीर महाराज अत्तार यांची कीर्तनसेवा संपन्न झाली.
मावळची भूमी ही संत–महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, भक्ती आणि शक्तीचा वारसा जपणारी भूमी म्हणून ओळखली जाते. याच अध्यात्मिक परंपरेला अधिक बळ देत, वारकरी संप्रदायाचा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि भक्तीचा मळा अधिक फुलावा या हेतूने श्री विठ्ठल परिवार, मावळ यांच्या वतीने गेली आठ वर्षापासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
कीर्तन महोत्सवाची सुरूवात विघ्नहर्ता गणरायाच्या विधिवत पूजेनंतर करण्यात आली. त्यानंतर वारकरी परंपरेचे प्राण असलेल्या टाळ, वीणा आणि मृदंगाचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. मृदंगाच्या थापांमधून आणि टाळांच्या गजरातून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. एका दिव्य अध्यात्मिक पर्वाची सुरुवात झाल्याची अनुभूती भाविकांना मिळाली.
मावळमध्ये होणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्ताभिमुख व्यवस्था. भव्य-दिव्य मंडप, आकर्षक सजावट, उत्कृष्ट आसन व्यवस्था, भोजनाची योग्य सोय आणि वारकऱ्यांसाठी सुयोग्य बसण्याची व्यवस्था यामुळे भाविक समाधान व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील नामवंत व मोठे कीर्तनकार येथे आपली कीर्तनरूपी सेवा देत असल्याने या सोहळ्याला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो. सोमवारपर्यंत हा कीर्तन सोहळा सुरू असणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट

