व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘एफडीए’ची मावळात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ! टाकवे बुद्रुक हद्दीतील कंपनीत टाकलेल्या छाप्यात साडेएकतीस कोटींचा मुद्देमाल जप्त

मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या या पदार्थांचे उत्पादन केल्यामुळे एफडीएने संपूर्ण आस्थापना सील केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 5, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रूक येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ’सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर धाड टाकून प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर आणि प्रतिबंधित सुगंधी हुक्का तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली. यात ५.४८ लाख किलो वजनाचा प्रतिबंधित फ्लेवर्ड हुक्का आणि तंबाखूजन्य साठा जप्त केला आहे. तपासणीदरम्यान या साठ्यामध्ये ११६ प्रकारचे तयार पदार्थ, १८ प्रकारचा कच्चा माल आणि १८ प्रकारचे विविध फ्लेवर्स आढळून आले आहेत.

यामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेल्या ग्लिसरीन, फ्रुक्टोज आणि निकोटीनचा वापर करून ‘Afzal Authentic Flavoured Hookah’ या नावाने छुप्या पद्धतीने उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चौहान यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील नार्कोली येथे ३१ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना या विशेष पथकाला टाकवे येथील कंपनीचा सुगावा लागला होता. या प्रकरणी कंपनीचे संचालक आसिफ फाजलानी आणि फैजल फाजलानी यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई भंडाऱ्याचे सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकाने केली. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता जयंत टोणपे यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.

मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या या पदार्थांचे उत्पादन केल्यामुळे एफडीएने संपूर्ण आस्थापना सील केली आहे. मावळ परिसरात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ, फडणवीस सरकारचा निर्णय
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


Previous Post

‘स्वीकृत’साठी तरी मूळ ओबीसींचा विचार होणार का? ; तिकीटात डावललेल्या मूळ ओबीसींना ‘स्वीकृत’ची संधी देण्याची मागणी

Next Post

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gatha Dnyaneshwari Parayan Kirtan Festival organized at Shri kshetra Bhandara Dongar Maval

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sanitation workers honored by women sisters of Shantai Residency in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील शांताई रेसिडेन्सीतील महिलाभगिनींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
Chairman and Vice Chairman of Maval Taluka Buying and Selling Association resign

मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती-उपसभापती यांचे राजीनामे ; नवीन कारभारी निवडीकडे तालुक्याचे लक्ष

February 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक

February 23, 2026
New executive committee of Maval Taluka Primary Teachers Association announced

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे

February 23, 2026
Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा

February 23, 2026
Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.