व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खडकाळा – कार्ला जिल्हा परिषद गट : आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांना भाजपाकडून उमेदवारी जवळपास निश्चित

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली असून यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती मावळ चा देखील समावेश आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 15, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Khadkala Karla Zilla Parishad Group Ashatai Baburao Waikar is almost certain to be nominated by BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली असून यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती मावळ चा देखील समावेश आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करिता आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासूनच मावळ तालुक्यातील जवळपास पाचही गट आणि दहाही गणांत इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. यामध्ये खडकाळा – कार्ला जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या इच्छुक उमेदवार म्हणून आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा राहिली आहे. दरम्यान लवकरच भाजपाकडून आशाताई वायकर यांना अधिकृत उमेदवारी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सभापती आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे वरिष्ठ नेते बाबुरावआप्पा वायकर यांच्या पत्नी असलेल्या आशाताई वायकर या नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. तसेच इच्छुुक उमेदवार म्हणून खडकाळा – कार्ला गटात निवडणुकीच्या तयारीला लागल्यापासून आशाताई वायकर यांचा झंझावात पाहायला मिळत आहे. गेल्या तीन चार महिन्यांत जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव आणि घरापर्यंत पोहोचून त्यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे अशा सक्षम आणि तयार उमेदवाराला भाजपा कडून या महत्वाच्या जिल्हा परिषद गटाती युतीकडून अधिकृत उमेदवारी दिली जाईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. मावळ तालुक्यात पुणे जिल्हा परिष देचे एकूण पाच गट आहेत, तर पंचायत समिती मावळचे एकूण दहा गण आहेत. सर्व गट आणि गणांत आरक्षण सोडत झाल्यापासून इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. परंतु आता प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यामुळे उमेदवारांची धावपळ वाढली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक


Previous Post

कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गट : भाजपाकडून भाऊसाहेब गुंड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी ; तिकीट नाकारल्यास बंडखोरीचीही शक्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Grand show of strength from worker rally NCP Maval first list of candidates to be released on 22nd

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी ; तिकीट नाकारल्यास बंडखोरीचीही शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.