व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी : इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात

उमेदवारीचं होईल ते होईल.. प्रचार मात्र जोरात !

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 18, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

File Image


Dainik Maval News : गेली अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे स्वप्न पाहिलेले आणि ‘खिसा रिकामा करून बसलेले’ इच्छुक उमेदवार आता प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यानंतर अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता थेट प्रचाराच्या कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिकीटासाठी असलेली भलीमोठी रांग पाहता, आपला नंबर लागो अथवा न लागो, जोडलेल्या जनसंपर्काच्या जोरावर इच्छुक उमेदवार दंड थोपटून तयारीत असलेले पाहायला मिळत आहे.

मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समिती मावळ च्या दहा जागा अर्थात दहा गण आहेत. या सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या दोन दिवसांत तब्बल ११५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून नेले आहेत. अर्थात यात अनेक हौशे – नवशे असणारच, परंतु पहिल्या दोन दिवसांतील अर्जांची विक्री पाहता, इच्छुकांचा आकडा नक्कीच मोठा आहे, हे चित्र तर स्पष्ट झाले आहे.

मावळात सद्यस्थितीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन प्रबळ पक्ष असून शिवसेना, शिवसेना उबाठा, आरपीआय, काँग्रेस (आय), वंचित बहुजन आघाडी असे इतरही पक्ष आहे. यांतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे सर्वाधिक उमेदवारांची गर्दी असून या गर्दीत असेही अनेक उमेदवार आहेत, जे गेली अनेक महिने अन् वर्षभरापासून ‘खिसा रिकामा करून’ निवडणुकीची तयारी करून बसले आहेत. अशात हे उमेदवार आता अधिकृत उमेदवारीची वाट न पाहता, आता लढायचंच, या भूमिकेत आलेले दिसतात.

उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिनांक अर्थात २७ जानेवारीपर्यंत ‘अधिकृत’चा शिक्का उमेदवारावर पडण्याची शक्यता असते, अनेकदा अपक्षालाही पुरस्कृत करण्याची वेळ निवडणूक काळात पक्षांवर येते, त्यामुळे आता तिकीट जाहीर होवो अथवा न होवो, पण फॉर्म भरायचा आणि तयारीत राहायचं हा फॉर्म्युला स्वीकारून अनेक उमेदवार थेट प्रचाराच्या कामाला लागल्याचे चित्र मावळ तालुक्यात दिसत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला


dainik maval jahirat

Previous Post

इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात महाविकासआघाडी सर्व पंधरा जागांवर उमेदवार देणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 Maha Vikas Aghadi will field candidates for all seats in Maval

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात महाविकासआघाडी सर्व पंधरा जागांवर उमेदवार देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.