व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा – राष्ट्रवादी आमनेसामने ! आमदार सुनील शेळके यांची भाजपा नेत्यांवर सडकून टीका

मावळच्या जनतेने तुम्हाला मतदान का करायचे, असा सवाल करीत आमदार सुनील शेळके यांनी मावळातील भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 22, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
BJP NCP face to face while filing nomination papers MLA Sunil Shelke criticizes BJP leaders Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळच्या जनतेने तुम्हाला मतदान का करायचे, असा सवाल करीत आमदार सुनील शेळके यांनी मावळातील भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली. पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. तालुक्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत विकासकामे करण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासनही आमदार शेळके यांनी दिले.

वडगाव मावळ येथे जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यावेळी झालेल्या सभेत आमदार सुनील शेळके बोलत होते. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांची युती आहे. मंगळवारी युतीचे अधिकृत उमेदवारांचे अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शनासह दाखल करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे, स्वाभिमानी रिपाइंचे अध्यक्ष रमेश साळवे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, सारिका शेळके, नगराध्यक्षा अबोली ढोरे, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, युवक अध्यक्ष किशोर सातकर उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, राज्यात आम्ही युती म्हणून काम करतोय. मग, तालुक्यात संघर्ष कशाला हवा, यासाठी युती करण्याचा प्रयत्न नगर परिषद निवडणुकीत केला होता. पण त्या निवडणुकीतील अनुभव घेऊन या निवडणुकीत भाजपसोबत युती करायची नाही, असा निश्चय केला असून या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करू नका, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला.

गणेश खांडगे म्हणाले, आमदार शेळके यांच्या माध्यमातून तालुक्याला विकासस्पर्श झाला आहे. कुस बदलल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. याचा परिणाम या निवडणुकांमध्ये मतांच्या रूपाने दिसला पाहिजे, असे आवाहन केले.

रमेश साळवे म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टवादीसोबत होतो. आताच्या निवडणुकांमध्येही ही भूमिका कायम असून पंचायत समितीवर आपलाच सभापती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नारायण भालेराव यांनीही रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादीसोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले.

भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वतीने वडगाव शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या वतीने भव्य रॅली काढून पंचायत समिती समोरील चौकात जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा अखेरच्या टप्प्याकडे असताना भाजपची रॅली ही चौकात दाखल झाली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. तसेच सभा चालू असलेल्या ठिकाणापासूनच भाजपा कार्यकर्ते तहसील कार्यालयाकडे जमावाने निघाले. त्यामुळे काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक २०२६ : मावळात भाजपा-शिवसेना पक्षाची युती, अधिकृत उमेदवार जाहीर – पाहा संपूर्ण यादी

Next Post

मावळ तालुक्यात तब्बल २३ वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम ! २३ जानेवारीला होणार आरंभ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dharatirth Gadkot Mohim in Maval taluka after 23 years It will start on 23rd January

मावळ तालुक्यात तब्बल २३ वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम ! २३ जानेवारीला होणार आरंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.