Dainik Maval News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येत असलेले खासगी लियरजेट 45 हे विमान धावपट्टीच्या अगदी बाजूला असलेल्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात दोन क्रू मेंबर्स (पायलट आणि को-पायलट), एक पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) आणि एक अटेंडंट यांचा समावेश आहे. अपघाताची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून, हजारो लोक घटनास्थळी जमा झाले.
Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

