Dainik Maval News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांच्या निधनामुळे मावळ तालुका स्तब्ध आणि सुन्न झाला आहे. मावळच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांचे झालेले अकाली निधन हे सर्वात मोठी हानी असून कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. अशात राज्यात असलेल्या शासकीय दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ३०) संपूर्ण मावळ तालुक्यात गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शोकसभा आयोजिक करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका यांच्याकडून श्रद्धांजली संदेश –
“महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार आणि मावळ तालुक्याच्या राजकीय इतिहासात अढळ ठसा उमटवणाऱ्या माजी आमदार स्व. रूपलेखा ढोरे यांचे दुःखद निधन संपूर्ण मावळ तालुक्यासाठी अपार वेदना देणारे असून मन सुन्न करणारे आहे. आज मावळचा प्रत्येक कोपरा शोकमग्न झाला आहे. डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि आठवणींचा गहिवर दाटून आला आहे.
या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांना कृतज्ञतेने, श्रद्धेने व माणुसकीच्या भावनेनेअंतिम अभिवादन करण्यासाठी मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव व प्रत्येक शहरात शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी.” शोकाकुल, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
