व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रचाराचं स्वरूप बदलणार.. सभा, रॅली थंडावणार.. डिजे, वाद्ये टाळणार.. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत केवळ कार्यकर्ते दिसणार..

अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारपद्धतीत बदल होण्याची शक्यता

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 30, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
NO DJ RALLY Halgi in Prachan rally in zp panchayat samiti

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके ‘दादा’ अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. दरम्यान बुधवारीच मावळ तालुक्यात मावळच्या माजी आमदार रुपलेखा ताई ढोरे यांचेही दुःखद निधन झाले आहे. या दोन्ही अनपेक्षित आणि दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात बदल होण्याची शक्यता दिसत आहे.

मावळ तालुक्यात पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळकरिता निवडणुक होत आहे. दरम्यान मावळात निवडणूकीच्या निमित्ताने नेहमीच वेगळं चित्र पाहायला मिळतं. डिजेवर वाजणारी प्रचार गिते, नेत्यांपुढे वाजणारी वाद्ये, ढोल-ताशे हलगी यांचा दणदणाट आणि नेते – कार्यकर्ते यांच्या भव्य रॅली, सभा असे चित्र दिसत असते. परंतु अजित दादा आणि रुपलेखाताई यांच्या निधनानंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील प्रचारपद्धतीत बदल होण्याची चिन्हे आहे.

त्यानुसार, आता उर्वरित दिवसांत, सभा – रॅली काढल्या जाणार नाहीत, प्रचारात डिजे – वाद्ये यांचा दणदणाट होणार नाही अशी चर्चा होत आहे. तसेच सर्वच पक्षांतील नेते, पदाधिकारी या पद्धतीनेच पुढे जाण्या बाबत सकारात्मक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूका समजल्या जातात, त्यामुळे या निवडणुकींत केवळ कार्यकर्तेच दिसतील आणि ते ताकदीने प्रचारात उतरून प्रचार करतील, नेत्यांच्या सभा – भाषणे होणार नाहीत, असे बोलले जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


dainik maval jahirat

Previous Post

अजितदादांच्या निधनानंतर मावळातील प्रचार थांबला ; राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाकडूनही प्रचाराला स्थगिती

Next Post

मावळ तालुक्यात आज गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शोकसभा आयोजित

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
change in campaigning method for Zilla Parishad Panchayat Samiti elections after death of Ajit Pawar

मावळ तालुक्यात आज गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शोकसभा आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.