Dainik Maval News : अनियमित कामकाजाच्या आरोपावरून चौकशी सुरू असलेल्या वडगाव मावळच्या उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांचा पदभार अखेर काढून घेण्यात आला आहे. चार महिने चाललेल्या या चौकशीतून काही बाबी उघड झाल्याने हा पदभार काढून घेण्यात आला असून पिंगळे यांच्याकडील उप अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार खेडचे उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
भूमी अभिलेख विभागाचे अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी शुक्रवारी (२३ जानेवारी) हे आदेश जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
पिंगळे यांच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. तसेच त्यांच्या अनियमित कामाबाबतही आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यावरून नागपूर येथील जिल्हा अधीक्षक भूषण मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमार्फत त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात आली होती.
बारामती भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संजय घोंगडे, वाईचे भूमी अभिलेख उपअधीक्षक शैलेश साठे यांचा समावेश असलेल्या या त्रिसदस्य समितीने गेल्या नोव्हेंबरमध्येच आपला अहवाल जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सादर केला होता. या चौकशी अहवालाच्या आधारेच पल्लवी पिंगळे यांचा पदभार काढून घेण्याचा निर्णय झाला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
