Dainik Maval News : मावळ तालुक्यात होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अशोक विठ्ठल दाते यांचा गावभेट संवाद दौरा सध्या सुरू आहे. शनिवारी (दि.३१) आंदर मावळ विभागात डॉ. अशोक दाते यांचा गावभेट दौरा संपन्न झाला. यावेळी प्रत्येक गावात मतदारांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. दाते यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन निवडणुकीत विजयी करण्याचा संकल्प अनेक ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखविला.
शनिवारी (दि.३१) आंदर मावळातील फळणे, दवणेवाडी, माऊ, मोरमारवाडी, गभालेवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, वडेश्वर, लष्करवाडी, शिंदे-घाटेवाडी, नागाथली, वहानगाव, कुसवली, कांब्रे (आ.मा.), बोरवली, डाहुली, चिरेखाणी, रढेवाडी, मोरमारवाडी, कुसूर, खांडी, गोंटेवाडी, आढारवाडी, ढोंगेवाडी, मेठलवाडी, सावळा गावठाण, माळेगाव बुद्रुक, तळपेवाडी, पिंपरी, माळेगाव खुर्द, कुणेवाडी, कुणे अनसुटे, पारिठेवाडी, इंगळून, किवळे-पिचडवाडी, कशाळ या गावांतील मतदारांच्या डॉ. अशोक विठ्ठल दाते यांनी गाठीभेटी घेतल्या.
सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील डॉ. अशोक दाते यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काम करीत असताना ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’, या भावनेने त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे समाजसेवेचा वसा असलेला व्यक्ती अशी त्यांची ओळख सामान्यांमध्ये आहे. प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार करण्याचे ब्रीद त्यांनी उराशी बाळगले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार आणि धोरणांनुसार सर्वसमावेशक विकास करण्याचे त्यांचे ध्येय आहे. हे ध्येय, व्हिजन घेऊन ते मतदारांपर्यंत पोहचत असून मतदारांचा देखील त्यांना प्रतिसाद मिळत आहे.
एक उच्चशिक्षित उमेदवार, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची – समस्यांची जाण असणारा उमेदवार, आरोग्य – शिक्षण – रोजगार आणि पायाभूत सुविधांबाबत योग्य व्हिजन असलेला उमेदवार म्हणून डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक पाठींबा मिळत आहे. तसेच निवडणुकीत मतरूपी आशीर्वाद देत डॉ. अशोक दाते यांच्या रुपाने एक उच्चशिक्षित उमेदवार निवडण्याचा निर्धार मतदार व्यक्त करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
