व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटामध्ये आज स्वर्गीय अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा

कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद गटामध्ये रविवारी स्वर्गीय अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 1, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Late Ajit dada Pawar Raksha Kalash Darshan Yatra today in Karla Khadkala Zilla Parishad group Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटामध्ये रविवारी स्वर्गीय अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पाथरगाव या ठिकाणाहून सदरची रक्षा कालच दर्शन यात्रा सुरू होणार आहे. पुढे पिंपळोली, ताजे, बोरज, घरकुल, मळवली, पाटण, डोंगरगाव वाडी, केवरे वसाहत, डोंगरगाव, कुणेनामा, पांगलोळी या गावांमध्ये सदरचा रक्षा कलश रथ जाणार आहे.

Novel NIBR Ads

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुःखद असे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. मागील चार दिवसापासून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार थांबवण्यात आला होता. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक येत्या सात फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अजित दादा पवार यांच्या दुखद निधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर प्रचार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान पत्रके वाटप करत हात जोडून मत देण्याची मागणी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत हीच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली अशा स्वरूपाची निवेदने या निवडणुकीच्या निमित्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.

मावळ तालुक्याच्या विकासासाठी अजित दादा पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. अजित दादा यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमधूनच मावळ तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. याची आठवण मतदारांना या कलश यात्रा व पत्रकाच्या निमित्त करून दिले जाणार असून अजित दादांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून द्या असे आव्हान मतदारांना केले जाणार आहेत.

दिपाली दीपक हुलावळे, दीपक हुलावळे यांनी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटांमधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी देत विकास कामांना चालना दिली आहे. मतदारसंघांमध्ये आजपर्यंत केलेली विकास कामे व जनतेशी असलेला संपर्क याच मुद्द्यांवर आपण मतदारांकडे मते मागत आहोत व नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे. मतदारसंघांमध्ये दिपाली दीपक हुलावळे यांनी मोठी आघाडी मिळवली असून जनतेच्या पाठिंब्यावर मिळालेली उमेदवारी व केलेली विकास कामे यामुळे या जिल्हा परिषद गटामधील मतदार ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

Novel NIBR Ads

अजित दादा पवार यांच्या निधनाच्या दुःखद घटनेमुळे सध्या प्रचाराचा वेग मंदावला असला तरी सर्वसामान्य मतदार हा आजही हुलावळे परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हुलावळे परिवाराचे या संपूर्ण भागामध्ये मोठे योगदान असून मागील दोन पिढ्यांपासून या भागांमध्ये केलेल्या सामाजिक व राजकीय कामांमुळेच सर्वसामान्य मतदार त्यांच्याशी प्रेमाने व जिव्हाळ्याने जोडला गेलेला आहे. याच कारणांमुळे दिपाली हुलावळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार या संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये गावांनी केला असून गावोगावी त्यांना मिळत असलेला प्रतिसाद हे देखील विजयाचे धोतक असल्याचे बोलले जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ‘या’ तीन खात्यांचा पदभार ; ‘पॉवर’ मिळाली पण ‘तिजोरी’ नाही

Next Post

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक - नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.