Dainik Maval News : मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाचही गट आणि पंचायत समितीच्या दहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर आणि मुदत संपल्याच्या चार वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत अनेक जागा थेट भाजपाकडून खेचून आणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला मावळात धोबीपछाड दिला आहे.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय मिळवित भाजपाचा सुपडा साफ केला आहे. आमदार सुनील शेळके हेच या विजयाचे ‘खरे शिल्पकार’ आहेत, असे सामान्य नागरिक देखील सांगत आहेत. तसेच या विजयातून राष्ट्रवादीने भाजपाची पंचायत समितीवरील २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे.
मावळ पंचायत समितीवर २५ वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता होती. भाजपचा हा अभेद गड राष्ट्रवादीने ताब्यात घेतला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या सहा सात वर्षांत झालेल्या सर्वच निवडणुकीतील हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागणारा आहे.
आजचा निकाल म्हणजे अजित पवार जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आहे, असे सुनील शेळके यांनी म्हटले, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक (मावळ तालुका) : अंतिम निकालानंतरची महत्वपूर्ण आकडेवारी, राष्ट्रवादीला आणि भाजपाला किती टक्के मतदान?
– लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह