Dainik Maval News : मेहकर (जि. बुलढाणा) येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा २६ वर्षीय पुत्र प्रज्वल गिरी याचा ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लोणावळा येथील दरीत कोसळून त्याचे दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रज्वल गिरी हा पुणे येथे बीएडचे शिक्षण घेत होता. तिथेच तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. ८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा त्याच्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याला येत होता. लोणावळा येथे अल्पोपहार करण्यासाठी ही मंडळी थांबली. परंतु प्रज्वल आणि त्याचा मावसभाऊ या दोघांनी आम्ही टेकडीवरून फिरून येतो, असं सांगितले.
मात्र टेकडीवर फेरफटका मारायला जाणं त्याच्या जीवावर बेतलं. तेथून फिरत असताना पाय घसरून प्रज्वल खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी मेहकर येथील मेएसो महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे त्यांनी पाचशेपेक्षा अधिक प्रयोग राज्यभर सादर केले आहेत.
क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे त्यांनी हजारावर सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले. प्रज्वलच्या मृतदेहावर मेहकर येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह
– मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली
– जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक (मावळ तालुका) : अंतिम निकालानंतरची महत्वपूर्ण आकडेवारी, राष्ट्रवादीला आणि भाजपाला किती टक्के मतदान?