Dainik Maval News : धनगव्हाण (ता. मावळ) गावात थोरली आई ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आदर्श माता कै. गंगुबाई धोंडिबा घारे (वय ६३ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १० ) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारीच धनगव्हाण (ता. मावळ) या गावी अंतिम संस्कार करण्यात आले.
सासरी थोरली जाऊबाई अन् मुलांची लाडकी थोरली आई ह्या नावाने परिचित असणाऱ्या कै. गंगुबाई, सतत हसरा चेहरा नात्यामध्ये प्रेमळता असा त्यांचा स्वभाव होता. ठाणे (मुंबई) येथे परिवारासमवेत राहत असताना मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
ओझर्डे हे त्यांचे माहेर होते. त्यांच्या पश्चात पती धोंडिबा रामजी घारे, दोन मुले संतोष धोंडिबा घारे आणि पत्रकार अनिल धोंडिबा घारे, मुलगी सुनंदा अदिक पाठारे यांसह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
– मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली

