Dainik Maval News : शेतीच्या जमिनीवर घर किंवा अन्य बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक (NA) परवानगी घेण्याची अट रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. यापुढे बांधकाम आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र ‘एनए’ परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वाची सुधारणा करणारा शासननिर्णय आणि राजपत्र जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने अकृषिक (NA) परवानगीची अट रद्द केल्यामुळे आता बांधकाम नकाशा मंजूर मिळताच स्वतंत्र परवानगीशिवाय शेतजमिनीवर घर बांधण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. जमीन महसूल संहितेतील नवीन सुधारणेनुसार शेतजमिनीवर बांधकामासाठी नगर रचना विभाग तसेच स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी किंवा मंजुरी हीच आता ‘एनए’ परवानगी असणार आहे.
आतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजुरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अकृषक परवानगीसाठी चकरा माराव्या लागत होत्या. नव्या नियमानुसार, जर एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल, तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच ‘अकृषक परवानगी’ मानली जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज राहणार नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
– मार्केटयार्ड (पुणे) ते शिळींब (ता. मावळ) पीएमपीएमएल बससेवेचा प्रारंभ ; स्थानिकांच्या मागणीला आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

