व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

ग्रामीण विकासासाठी १३५ कोटी, परिवहन विकासासाठी ११५ कोटी, नागरी पायाभूत सुविधांसाठी ११६.२५ कोटी, पारंपारिक ऊर्जा विकासासाठी ८० कोटी, पर्यटन विकासासाठी ५६.८६ कोटींची तरतूद

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 12, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठी शासनाने प्रस्तावित केलेल्या १ हजार ३२.८८ कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण, परिवहन विकास, अपारंपारिक ऊर्जा व उर्जा, हरीत महाराष्ट्र, नागरी क्षेत्र व आरोग्य पायाभूत सुविधा, महिला व बालकांचे सशक्तीकरण, गतिमान प्रशासन, कौशल्यपुर्ण रोजगार निर्मिती, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधा आणि क्रीडा व कलागुणांचा विकासावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, सन २०२६-२७ च्या प्रस्तावित प्रारूप आराखड्यात मुख्यत्वाने ग्रामीण विकासासाठी १३५ कोटी रुपये, परिवहन विकासासाठी ११५ कोटी रुपये, नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी ११६.२५ कोटी रुपये, अपारंपारिक ऊर्जा व उर्जा विकासासाठी ८० कोटी रुपये तसेच पर्यटन विकासासाठी ५६.८६ कोटी रुपये, हरीत महाराष्ट्राकरिता ४० कोटी रुपये, आरोग्य पायाभूत सुविधांचा विकासकरिता ११०.७१ कोटी रुपये, महिला व बालकांचे सशक्तीकरण २९.४४ कोटी रुपये, गतिमान प्रशासन ७८.५० कोटी रुपये, कौशल्यपुर्ण रोजगार निर्मिती १०.५ कोटी रुपये, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर १०० कोटी रुपये, क्रीडा व कलागुणांचा विकासाकरिता १०.१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सन २०२६-२७ साठी शासनाने १ हजार ३२.८८ कोटी रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित केली असली तरी विविध विभागांकडून एकूण ३ हजार १२८ कोटी रुपयांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. त्या मागण्यांची छाननी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व प्राधान्यक्रमातील प्रकल्पांचा समावेश करण्यात येत आहे. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांच्या छाननीनंतर ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीमार्फत लहान तुकड्यांमध्ये कामे न करता अधिकाधिक नागरिकांना लाभ देणारे मोठे व परिणामकारक प्रकल्प राबविण्यावर भर द्यावा. अतिमागास व दुर्गम भागांच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे. सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करून त्याचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

सन २०२५-२६ साठी मंजूर १ हजार ३७९ कोटी रुपयांच्या सर्वसाधारण योजनेसह एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या नियतव्ययाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण योजना १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपायोजना १४५ कोटी रुपये तसेच आदिवासी घटक कार्यक्रम ६५ कोटी ४६ लाख रुपये यांचा समावेश आहे. निधी वेळेत व नियोजनबद्ध खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घालून दिलेल्या शिस्त, गुणवत्ता व कालमर्यादेच्या तत्त्वांनुसार सुरू प्रकल्प दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष उपस्थितीत सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरणाद्वारे सन २०२५-२६ मधील खर्चाचा आढावा सादर केला. तसेच सन २०२६-२७ च्या प्रस्तावित प्रारूप आराखड्यात प्रामुख्याने कृषी विकास दरात व दरडोई कृषी उत्पन्नात वद्धी करण्याकरिता कृषी पुरक असणाऱ्या संलग्न क्षेत्रांच्या योजना, रास्त दर, निकोप स्पर्धा, सर्वांकरिता खुली बाजारपेठ, जलसंधारण व मृदसंधारणाची कामे, भुगर्भ पाणीसाठ्यात वाढीकरिता उपाययोजना यावर भर देण्यात आला आहे. बैठकीत उपस्थित मंत्री, खासदार व आमदार यांनी विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.

विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये आयोजित बैठकीत त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार अमित गोरखे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, सुनील शेळके, शंकर जगताप, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे;

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, पालक सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख व पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

Next Post

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.