व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांकडून सुरक्षीत सुटका

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 13, 2026
in मावळकट्टा, लोकल, शहर
As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ जवळील एका पॉलीहाऊसमध्ये स्वच्छता करण्याचे काम सुरू असताना येथील ओमकार ढोरे यांना जमिनीलगत काही साप हालचाल करताना दिसले. त्यांनी तातडीने याची कल्पना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद जिगर सोलंकी आणि यश बच्चे यांना दिली. सदस्यांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

पॉलीहाऊसच्या एका कोपऱ्यात साधारणतः ३-४ फूट जागेत शोध घेतला असता एकामागून एक तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ साप मिळून आले. विशेष म्हणजे यामध्ये पिल्ले, निम-प्रौढ आणि पूर्ण वाढ झालेले अशा सर्व वयोगटातील सापांचा समावेश होता. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने हे साप मिळण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

या घटनेनंतर तातडीने वडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना या रेस्क्यू बद्दल माहिती देण्यात आली. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली, सर्व सापांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या अनुकूल अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. या वेळीस ओमकार ढोरे, ओम दळवी, रोहित पवार, आदेश मुथा, निखिल साने यांनी रेस्क्यू कार्यात मदत केली.

खापरखवल्या साप :
फिप्सन्स शील्डटेल मराठी मध्ये खापरखवल्या साप हे बिनविषारी असून ते प्रामुख्याने जमिनीखाली किंवा ओलावा असलेल्या मातीत राहणे पसंत करतात. यांना ‘कवचासारखी शेपटी असलेले साप’ असेही म्हटले जाते. एकाच छोट्या जागेत १३ साप आढळणे हे दुर्मिळ गोष्ट आहे.

हा साप प्रामुख्याने गांडुळ खातो आणि पावसात जास्त करून जमिनी वर दिसतो. हे साप जास्ती करून शेत किंवा पॉलीहाऊस च्या परिसरात जास्त प्रमाणात आढळून येतात, माती मध्ये राहणाऱ्या या सापाला शेतात किटकनाशक मुळे किंवा नांगरताना धोका होऊ शकतो. म्हणून हे सगळे साप त्यांच्या अनुकूल अधिवासात जिथे त्यांनी काही धोका निर्माण होऊ नये अशा जागी सोडण्यात आले. IUCN या रेड लिस्ट मधे हा साप अजूनही ‘Vulnerable’ कॅटेगरी मध्ये येतो. अशा दुर्मिळ जीवांचे संरक्षण आणि अजून जास्त अभ्यास करण्याची गरज आहे.
– जिगर सोलंकी, वन्यजीव संशोधक

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अधळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू


Previous Post

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

February 13, 2026
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

February 13, 2026
Lions Point near Lonavala becoming suicide point body of youth was found in 250 feet deep gorge

लोणावळा जवळील जगप्रसिद्ध लायन्स पॉइंट ठरतोय आत्महत्येचा पॉइंट ? 250 फूट खोल दरीत आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह

February 13, 2026
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
From Congress dominance to BJP Supda Saaf complete history of Maval Panchayat Samiti Pune Zilla Parishad

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

February 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.