Dainik Maval News : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.१०) सायं. पाच वाजताच्या सुमारास सोमाटणे फाटा ते तळेगाव रोडवर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले (वय ४०, नेमणूक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ४१ आणि ४३ वर्षीय दोन महिलांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून, शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य करताना आढळून आल्या. सहाय्यक पोलीस फौजदार वाघ हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

