Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच वडगाव येथे पार पडले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र जगताप, खंडेराव ढोबळे, ज्ञानेश्वर पुंडे, रमेश मारणे, धनंजय जगताप आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, पल्लवी दाभाडे, मनीषा मुऱ्हे, दीपाली हुलावळे, मावळ पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, दिलीप ढोरे, समीर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
सदर अधिवेशनात शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ४८ गुणवंत शिक्षकांना गौरविण्यात आले. नवनाथ आडकर यांनी प्रास्ताविक केले. नितीन वाघमारे, पुष्पा घोडके, सुभाष भानुसघरे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा गाडे यांनी आभार मानले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप
– वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे
– वडगाव येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे
– चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

