व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री

विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण वाढवा - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2026
in महाराष्ट्र
boards giving information about government schemes for students should be displayed in all schools

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, शिक्षण संचालक (एनसीईआरटी) हेमंत वसेकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, उपसचिव तुषार महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालकांना नसते. या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले जावे. प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावली जावी.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह, तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉक्सो कायदा अंतर्गत नुसार पिडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा 2,250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधी सुरू केलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व अनुदान व विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी आणि प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. एकूण 21534199 विद्यार्थ्यांपैकी 1045125 विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी असून त्या साठी कार्यवाही केली जावी अशा सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित विविध बाबींची माहितीच सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा
– सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड 


Previous Post

ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री

Next Post

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.