व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांकडून राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित ; स्व. अजितदादांचे स्मारक अन् त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच अजित पवार यांची आठवण काढली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2026
in महाराष्ट्र
CM Devendra Fanavis dedicates state budget to Ajit Pawar memory award and memorial announce

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री स्व. अजित पवार यांचे पदावर असताना दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वित्तमंत्री पदाचा पदभार स्वीकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजरोजी (दि. ६) अर्थसंकल्पीय अधिवेशवनात राज्याचा २०२६ – २०२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. दरम्यान अर्थसंकल्प सादर करताना सुरूवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. अजित पवार यांच्या आठवणींनी आपण भावूक झालो असल्याचे सांगत, यंदाचा हा अर्थसंकल्प अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित असल्याचे म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच अजित पवार यांची आठवण काढली. मुख्यमंत्री म्हणाले की, “हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”

पुढे बोलताना, “त्यांनी ऐकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे भव्य स्मारक आणि त्यांच्या नावे पुरस्काराचीही घोषणा केली. “अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतीमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


Previous Post

मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

Next Post

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Way cleared for construction of new flyover at Karla Phata Maval MSRDC approves project and fund

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; 'एमएसआरडीसी'कडून प्रकल्पास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.