व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू असून मावळ तालुक्यातील प्रत्येक मंडलात हे अभियान राबविले जाईल.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 8, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महसूल विभागामार्फत राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा शनिवारी (दि. ७) मावळ तालुक्यात सुरू झाला. परंदवडी-शिवणे मंडलात सुरू झालेल्या या अभियानात पहिल्या दिवशी ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, उपगट विकास अधिकारी सेवक थोरात आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू असून मावळ तालुक्यातील प्रत्येक मंडलात हे अभियान राबविले जाईल. शनिवारी परंदवडी – शिवणे मंडलातून अभियानाची सुरूवात झाली. यामध्ये चांदखेड येथे ७० कातकरी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

सदर उपक्रमामुळे कातकरी समाजातील बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीस मोठी मदत होणार आहे. आदिवासी समाजासाठी जातीचे प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असल्याने अनेक कातकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

याप्रसंगी दिनेश गायकवाड, अजित बावकर, संतोष नालव्हे, संदीप आगळे, बाळासाहेब माने, प्रदीप मुसूडगे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जातीचे दाखले मिळाल्यामुळे कातकरी बांधवांना शिक्षण, रोजगार व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा उपक्रम आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्याबद्दल आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगाव नगरपंचायत तर्फे वडगाव-कातवीतील महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.