Dainik Maval News : मावळ मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) नवनियुक्त आयुक्त अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
सदर बैठकीत लोणावळा शहरातील मुख्य रस्ता, स्कायवॉककडे जाणारा रस्ता तसेच देहूफाटा ते येलवाडी या मार्गांवरील रखडलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली.
याशिवाय मावळ तालुक्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अद्याप कन्सल्टंट नेमणूक न झाल्याने कामे रखडली असल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
तसेच ‘इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पा’अंतर्गत असलेली कामे टेंडर प्रक्रियेत अडकून पडल्याने त्यालाही विलंब होत असल्याचे बैठकीत समोर आले. या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त अभिजीत चौधरी यांनी कामांची गुणवत्ता राखत त्यांना गती देण्याचे आश्वासन दिले.
मावळच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुनील शेळके यांचा प्रशासकीय पाठपुरावा सातत्याने सुरू असून, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ते अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असल्याचे पुन्हा एकदा या बैठकीतून स्पष्ट झाले.
मावळ तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी घेतलेली ही बैठक मावळच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती अधिक वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना
