Dainik Maval News : मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुणे शहर आणि परिसरातील तीन तरूणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी ( दि. ३ मे ) दुपारी घडली. स्थानिक बचाव पथके आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.
मृत तरुणांची नावे :
१) अश्विन अनिल भालेराव
वय – १९
येरवडा पुणे
२) आयन आझर शेख
वय – २०
हडपसर
३) प्रथमेश भास्कर शिंदे
वय – २१
रा. पुणे
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे मित्र फिरण्यासाठी मावळमधील थुगाव परिसरात आले होते. पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे इतर दोन मित्रही पाण्यात ओढले गेले आणि तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ या बचाव संस्थांच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, पिंटू मानकर, कैसर शेख, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, रवी कोळी, राजू सय्यद, अनिश गराडे, पोलीस पाटील धनंजय पोटफोडे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. या पथकाने मोठ्या परिश्रमानंतर तिन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले.
सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने झडप घातल्याने थुगाव परिसरात आणि पुण्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही पर्यटकांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती

