व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

महावितरणच्या मुख्य कार्यालयात पिंपरी, चिंचवड आणि मावळमधील विद्युत विषयक कामासंदर्भात आढावा बैठक संपन्न

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2026
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळमधील भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन वीज यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. पुढील २० वर्षे डोळ्यासमोर ठेऊन वीज पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार पिंपरी, चिंचवड, थेरगाव, रावेत, तीर्थक्षेत्र देहूगाव येथे उपकेंद्राची निर्मिती केली जाणार आहे. रहाटणीतही उतिउच्चदाब केंद्र सुरु केले जाणार असून नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत. ताथवडेत अतिउच्चदाब केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेतील विद्युत विषयक कामासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी महावितरणाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात आढावा बैठक घेतली. चालू असलेली कामे, प्रलंबित कामे आणि प्रस्तावित कामांचा खासदार बारणे यांनी आढावा घेतला. प्रादेशिक संचालक सुनील काकडे, गणेशखिंड विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, ग्रामीणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजय नेते, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, शेखर मुरकुटे, केशव काळुमाळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, मामुर्डीतील उपकेंद्राचे मजबुतीकरण केले जाणार आहे. २२ केव्हीची भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. थेरगाव, चिंचवड, रावेत, पिंपरी येथे उपकेंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत. त्याअंतर्गत विविध कामे सुरु केली आहेत. देहूगाव येथे उपकेंद्राची निर्मिती केली जाणार आहे. ताथवडे येथे अतिउच्चदाब नवीन उपकेंद्र मंजूर आहे. यशदाच्या जागेत हे अतिउच्चदाब हे उपकेंद्र सुरु होणार आहे. येथील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. रहाटणीतही उतिउच्चदाब केंद्र सुरु केले जाणार असून नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तळेगाव एमआयडीसीतील आंबीतील अतिउच्चदाब केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

खासदार बारणे म्हणाले, विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विविध कामे हाती घेतली जाणार आहे. विद्युत विषयक कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी ठेवला जातो. त्यासाठी यंदा १७ कोटींचा निधी ठेवला आहे. प्रधानमंत्री सुर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत-जास्त लोकांपर्यंत जाऊन रुफटॉप सोलर बसवून द्यावेत. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत जनजागृती करावी. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करुन मीटर बसवावेत. सबस्टेशनसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जास्तीत-जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला आहे.

तळेगाव एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा
मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे, उर्से, अंबी, लोणावळा, पवनानगर येथे अति उच्चदाब केंद्र कार्यान्वित आहेत. लोणावळ्यात नांगराव येथे, तळेगाव दाभाडेतील अंबी, माळवाडी, मिंडेवाडी येथे लघुदाब व स्विचिंग उपकेंद्र कार्यान्वित आहे. यामुळे तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरु झाला आहे. भंडारा डोंगर येथे विद्युतीकरणाची एक कोटी ३९ लाखांची कामे पूर्ण केली असल्याचेही बारणे यांनी सांगितले.

गहुंजेत नवीन अतिउच्चदाब केंद्र
मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्युत कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी मोठी निधी मंजूर करुन घेतला जातो. त्यातून विविध कामे केली आहेत. राजमाची गाव विद्युतीकरणासाठी एक कोटींचा निधी मंजूर आहे. वडेश्वर येथे नवीन उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. गहुंजे येथे नवीन अतिउच्चदाब केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे तळेगावातील अति उच्चदाब केंद्रावरील भार कमी होणार असून मावळ तालुक्यातील ग्राहकांना अंखडित वीज पुरवठा होण्यास फायदा होणार आहे. मिंडेवाडीतील अतिउच्चदाब केंद्रामुळे चाकण फेज टू या केंद्राचा भार कमी होऊन तळेगाव एमआयडीसीतील उद्योगांना फायदा होईल. या केंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

Next Post

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडीए’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; 'पीएमआरडीए'ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.